Ad will apear here
Next
डॉ. चित्रा गोस्वामी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर
डॉ. चित्रा गोस्वामीरत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. चित्रा गोस्वामी यांची मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर (बीओएस) निवड झाली आहे. गेली १४ वर्षे त्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागात हिंदीच्या प्राध्यापिका आहेत. 

२०१५ ते २०१७ या कालावधीत त्यांनी कला शाखेचे उपप्राचार्यपद भूषविले. त्याआधी २००८ ते २०१४पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या कार्यक्रमाधिकारी म्हणून त्यांनी प्रभावी काम केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या त्या आजीव सभासद असून, संस्थेच्या विविध समित्यांवर त्या कार्यरत आहेत. हिंदी विभागात त्या ‘यूजी’ ते ‘पीजी’ स्तरावर अध्यापन करतात. मुंबई विद्यापीठात हिंदी विषयाच्या पीएचडी गाइड म्हणून त्यांना मान्यता आहे. 

मॉरिशस व रोड्रिगो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांची हिंदी व मराठीतील १२ पुस्तके, ४० शोधनिबंध आणि ३३ लेख प्रकाशित झाले आहेत. ‘यूजीसी, दिल्ली’चा बृहद् शोधप्रकल्प व मुंबई विद्यापीठाचा लघु शोधप्रकल्पही त्यांनी पूर्ण केला आहे. रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरही त्यांचे कार्यक्रम होतात. तसेच शाळा व महाविद्यालय स्तरावर त्या हिंदी विषयाचे मार्गदर्शन करतात. त्यांना विद्यापीठातर्फे ‘एनएसएस’च्या उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून दोनदा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर थेट कुलगुरूंकडून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, पदाधिकारी, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZNABR
Similar Posts
‘महिला ‘सीएं’नी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झटावे’ रत्नागिरी : ‘सीए इन्स्टिट्यूटने देशासाठी भरीव योगदान केले आहे. आता रत्नागिरीत परीक्षा केंद्र झाल्यामुळे अनेकांना सीए होण्याची संधी मिळत आहे. यशाला शॉर्टकट नसतो. ते मिळविण्यासाठी मेहनत करावीच लागते. येथील अनेक युवती सीए होऊ लागल्या आहेत. या स्त्री शक्तीने समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी झटावे,’ असे आवाहन
रत्नागिरीच्या ऐश्वर्याची इंग्लंडमधील खो-खो स्पर्धेसाठी निवड रत्नागिरी : सप्टेंबर २०१८मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेकरिता रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या सावंत हिची निवड झाली आहे.
‘शिक्षकांनी खुर्चीची योग्यता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत’ रत्नागिरी : ‘शिक्षक हा शाळेचा कणा आहे. शिक्षकांच्या खुर्चीची योग्यता वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिक्षकांनी एकमेकांना समजून घ्यावे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे काम संस्थेचे आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी प्रत्येक घटक संस्थेच्या गुणवत्ता सुधारासाठी प्रयत्न करते,’ असे प्रतिपादन रत्नागिरी
डॉ. पटवर्धन मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी गाइड रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निधी पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी गाइड म्हणून मान्यता मिळाली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language